जीवन जगण्याचा योग्य मार्ग संतच दाखवतात : आचार्य अमृताश्रम स्वामी


पारनेर तालुका प्रतिनीधी 

तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे भक्ति पंढरिचे आयोजन केले होते. श्रीसंत निळोबराय यांच्या अभंग गाथांचा प्रकाशन सोहळा व संत निळबारायांचा राहता वाडा, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोध्दार शुभारंभा निमीत्त रविवार  दि.१४ नोव्हेंबर ते रविवार दि.२१ नोव्हेंबर या कालावधीमधे संत निळोबाराय मंदिर परीसरामधे भक्तिपंढरीचे आयोजन केले आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा,सकाळी ८:३० ते १२ श्रीसंत निळोबाराय गाथा पारायण,नामजप, गाथाभजन, हभप एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली होते. तर दुपारी २ ते ४ संतपंचक जीवन चरित्र संतकथा श्रीकृष्ण कृपांकीत हभप डाॅ.विकासानंद महाराज मिसाळ यांची संतकथा आयोजित केली आहे. सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, दि.१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९  हभप आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज जोशीबाबा बीड यांचे सुश्राव्य हरीकिर्तन झाले. आचार्य अमृताश्रम स्वामी यांनी संत चरणपर श्रीसंत निळोबारायांच्या,

" मार्ग दाऊनि गेले आधीं | दयानिधी संत तें ||१|| 

तेणेंचि पंथें चालों जातां | न पडे गुंता कोठें कांहीं ||२|| 

मोडूनियां नाना मतें | देती सिद्धांतें सौरसु ||३|| 

निळा म्हणे ऐसे संत | कृपावंत सुखसिंधू ||४|| " 

या निळोबारायांच्या संतचरणपर अभंगावर  निरुपण केले.

संतसंगतीचे महत्व  सांगत असताना महाराज म्हणाले, संत दर्शनामुळे जे अदृश्य आहे तेपण दिसते.आपले आईवडील जन्म देतात पण जीवन जगण्याचा योग्य मार्ग संतच दाखवत असतात.आईवडील मुलाबाळांना पोसतात सांभाळतात,पण ते दु:खापासुन कायमचे रक्षण करु शकत नाहीत दु:ख निवारणासाठी संत  संगती महत्वाची आहे.संतांचा उपदेश समजुन घेवुन त्या  प्रमाणे आचरण ठेवुन आपल्या जन्माचे सार्थक करावे असे महाराज म्हणाले.

यावेळी हजारो भाविकांनी या किर्तनाचे श्रवण केले.जयविठ्ठल झाल्यावर ग्रामस्थांनी महाराजांचा सन्मान केला.किर्तनासाठी साथसंगत हभप भास्करमहाराज मोटे, विष्णु महाराज अंतरकर, शिवाजी महाराज माने,आदिनाथ महाराज गलधर, आळंदिकर विद्यार्थी, रोहीदास महाराज हारदे, गणेश महाराज शेंडे, गणेश महाराज गट यांची आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या