विहिरीत तोल गेल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू


श्रीगोंदा प्रतिनिधी :-विहिरीच्या बाजूला बोरे काढण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा तोल जाऊन विहीरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. 

 सविस्तर वृत्त असे की, येळपणे गावातील ठाणगे वाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय 11 वर्ष) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्यामध्ये त्याचे निधन झाले. तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्यामुळे त्याचा शोधाशोध घेतल्यामुळे विहिरीच्या कडेला त्याची चप्पल दिसून आली व संशय आल्यामुळे बांबूच्या सहाय्याने विहिरीमध्ये पाहिले असता विहिरीत असल्याचे शंका आली बाहेर काढले असता,अभिषेक चा दरम्यान मृत्यू झाला होता. 

 अभिषेक श्री.खंडेश्वर माध्यमिक विद्यालय येळपणे येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. अभिषेक चे वडील हे शेती करतात व त्याच्या आईचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्याने लकडे कुटुंबावर हा दुहेरी आघात झालेला आहे. 

तसेच येळपणे गावचे सरपंच किरण धावडे,माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलदादा वीर, कुकडी सह.सा.का.संचालक आबा पाटील पवार,ग्रा.पंचायत सदस्य भाऊसाहेब पवार,प्रा.लकडे सर,खंडेराव शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक पवार,आजी-माजी सरपंच,उपसरपंच,अभिषेक चे सर्व शिक्षक वृंद,अनेक जणांनी लकडे कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

Attachments area


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या