भाळवणी प्रतिनिधी
वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा दिवस असतो, परंतु या दिवशी आपण समाजोपयोगी कार्य केले पाहिजे. याचाच विचार करून पारनेर येथील सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतिफ राजे यांनी 'माझी वसुंधरा - माझी जबाबदारी' या उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जवळपास १०० विविध भारतीय प्रजातींच्या रोपांची लागवड करून आपला वाढदिवस पर्यावरणीय पद्धतीने साजरा केला.
पारनेर - जामगाव रस्त्यालगत तराळवाडी परिसरातील पारनेर नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाच्या परिसरात सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष व उपक्रमशील शिक्षक लतिफ राजे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत म्हणाल्या की, आपले पर्यावरण, आपला परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी माझी वसुंधरा या उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे. पारनेर व परिसरामध्ये लतिफ राजे यांचे वृक्षारोपण व संवर्धनाबाबतचे कार्य मोठे आहे. आज त्यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.
0 टिप्पण्या