आता पेट्रोल पंपावर मिळणार लसऔरंगाबादः शहरातील पेट्रोल पंपांवर आता नागरिकांसाठी लसीकरणाची सोय सुरु करण्यात आली आहे. देशातील लसीकरण मोहिमेत औरंगाबाद जिल्हा पिछाडीवर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी अधिक आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत लस न घेणाऱ्या नागरिकांना पेट्रोलपंपावर पेट्रोल न देण्याच्या आदेश देण्यात आले होते. लस प्रमाणपत्र तपासल्याशिवाय पेट्रोल देणाऱ्या पंपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईदेखील सुरु होती. मात्र पेट्रोलपंपांवरच लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी पेट्रोल पंप असोसिएशनतर्फे अनेक दिवसांपासून केली जात आहे. आता ती मान्य करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या