अखेर उपनगराध्यक्ष यांनी स्वखर्चाने बसवले गतिरोधक


आळंदी 

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा च्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी संपूर्ण आळंदीतील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले असून झाले.सिमेंट काँक्रिटीकरण झालेल्या या रस्त्यावरून वाहनांचा वेग वाढला आहे.वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक लावण्याची मागणी वेळोवेळी राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी आळंदी नगरपरिषदेकडे केली होती.मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अखेर येथील आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांनी प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्वखर्चाने गतिरोधक बसवले आहेत.

सदर गतिरोधकाचे पुजन मावळचे आमदार सुनिल शेळके आणि आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,खेड तालुका भाजपा अध्यक्ष शांताराम भोसले,पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे,नगरसेवक प्रकाश कु-हाडे, सचिन गिलबिले,प्रशांत कु-हाडे,ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,हभप पुरुषोत्तम महाराज पाटील,माजी नगरसेवक विलास घुंडरे,आनंद मुंगसे,ज्ञानेश्वर रायकर,दिनेश घुले,नितीन घुंडरे,पद्माकर तापकीर,मयूर घुंडरे,अविरत फाउंडेशनचे अध्यक्ष निसारभाई सय्यद,कामगार नेते अरुण घुंडरे,मनोज कु-हाडे,संदिप महाराज लोहार,शिवसेना महिला शहर प्रमुख मंगलताई हुंडारे,राहुल घुंडरे,जयदीप घुंडरे,नगरसेवक आदित्य घुंडरे यांचा मित्रपरिवार मोठा संख्येने उपस्थित होते. 

आळंदी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये वारकरी शिक्षण संस्था,ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यालय,आळंदी नगरपरिषदेची शाळा,स्वामींचा मठ,ज्ञानेश्वरी मंदिर,भाजी मंडई,अनेक धर्मशाळा तसेच आळंदीहून चाकणला जाणारा चाकण रोड असल्याने या भागात वाहनांची वर्दळ कायम असते.रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा वेग वाढवला आहे. यामुळे मागील काही वर्षापासून अनेकांचे लहानमोठे अपघात रोजच घडत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून गतिरोधक बसवण्याच्या करण्यात आलेल्या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात होती.यामुळे रोज घडणारे लहानमोठे अपघात रोखण्यासाठी व वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांनी स्वखर्चाने गतिरोधक बसवले आहेत.यामुळे वाहनचालकांनी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या