Breaking News

चोरट्यांनी तीन दुकाने फोडली


प्रतिनिधी : निरगुडसर

निरगुडसर येथील मंचर निरगुडसर-रस्त्यावरील बिरोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या व्यापारी गाळ्यामधील तीन दुकाने  चोरट्यांनी फोडून २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात रोख रक्कम व कॅमेरा डी.व्ही.आर.चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 चोरी झालेल्या दुकानांपैकी नवनाथ थोरात यांच्या बिरोबा अॅग्रो सर्विसेस मधील कॅमेरा डि.व्ही.आर  दहा हजार रुपये किंमतीचा व २००० रुपये रोख रक्कम तसेच शेती मित्र अॅग्रो टेक्नॉलॉजी या कार्यालयातील गणेश हिंगे व अकबर पटेल यांची १००० रुपये रोख रक्कम लंपास करून सामान अस्ताव्यस्त केले व राॅयल केक शाॅप मधील प्रतिक मेंगडे यांची ७,००० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. दुकांनांच्या पुढच्या बाजूला सी.सी.टिव्ही कॅमेरे असल्यामुळे चोरट्यांनी मागच्या बाजुने  मशीनच्याय सहाय्याने नट खोलले व आत प्रवेश केला.व चोरी केली.ह्या घटनेची माहिती मिळतात मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश होडकर व पोलीस सहकारी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा करत सदर ठिकाणच्या फिंगर प्रिंट घेतल्या असून पुढील तपास करत आहेत.या पुर्वी ही सातत्याने केबल चोरी,चंदन चोरी या घटना निरगुडसर परीसरात घडत असुन विशेष बाब म्हणजे रविवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते बिरोबा अॅग्रो सर्विसेस या नवनाथ थोरात यांच्या दुकानाचा उद्घाटन समारंभ पार पडला होता.त्यामुळे परीसरातील नागरीक दुकानदार भयभीत झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करुन चोरटे जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments