कडूनिबंच्या झाडावर व्हायरस शेंडे वाळण्याचे प्रमाण वाढले


पुणतांबा ( प्रतिनिधी)

परिसरात कडूनिंबाच्या झाडांचे शेंडे आपोआप वाळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात चितेंत आहेत.

कडूनिंबाचे झाड हे बहुगुणी समजले जाते अनेक रोगांवर लिंबाची साल पाने गुणकारी म्हणून वापरली जातात पण त्याच झाडाची शेंडे वाळून चाललेली असल्यामुळे झांडावर एक प्रकारचा व्हायरस आलेला असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. कारण ह्या रोगाने झाडाचे सर्वच शेंडे वाळून टाकले आहेत. झाड छोटे की मोठे असा कोणताही भेदाभेद नसून सर्वच झांडावर त्याचा प्रार्दुभाव दिसून येत आहे.

 त्यावर नेमका काय इलाज करावा, याबाबत शेतकरी  संभ्रमात आहेत. लिंबाच्या झाडावर असा रोग येण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे जुन्या जाणकार व्यक्तींचे म्हणणे आहे.

 तसेच अशी घटना शुभ मानली जात नाही, असेही अनेकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शासनाच्या कृषी विभागाने लिंबाच्या झांडावर नेमका कोणता रोग आहे. याबाबत काय काळजी घेता येईल, यासाठी शेतकरी व वृक्ष प्रेमीमध्ये प्रबोधन करावे अशी मागणी दादासाहेब सांबारे ,बाळासाहेब जाधव तसेच राजेंद्र गुंजाळ यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या