रंगमंच आमचा तर कलाविष्कार तुमचा असेल : टेकवडे


वाल्हे प्रतिनिधी 

ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांसह प्रयोगशीलतेला वाव मिळावा यासाठी विविध स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात. परंतु अनेकवेळा स्पर्धकांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांच्यावर  नामुष्की देखील ओढवते. त्यामुळे आगामी काळात अशा स्पर्धकांचा आवडता रंगमंच आमचा तर कलाविष्कार तुमचा असेल असे प्रभावशाली मत बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी व्यक्त केले.

वाल्हे ( ता.पुरंदर ) नजीक अंबाजीचीवाडी येथे शिवराय क्रिकेट क्लब सह गड- किल्ले स्पर्धेतील बक्षीसांचे वितरण अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.या दरम्यान  क्रिकेट स्पर्धेत नवयुग क्रिकेट क्लब माळवाडी तर गड- किल्ले स्पर्धेत आदेश पवार हे प्रथम क्रमांकाने विजयाचे मानकरी ठरले. यावेळी आयोजित कार्यक्रमात टेकवडे हे बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष विक्रम फाळके जेष्ठ नेते सत्यवान सूर्यवंशी शिवसेनेचे नीरा गणप्रमुख राहुल यादव सामाजिक कार्यकर्ते अमोल कदम दौंडज ग्रामपंचायत सदस्य विजय फाळके जेजुरी ग्रामीण राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संकेत कोळेकर यांसह वैभव शिंदे अक्षय कदम साहिल पवार आदी उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाभिमानी पत्रकार गोरख मेमाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष पवार यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या