रेटवडी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन


खेड (ता.) प्रतिनिधी  

खेड तालुका बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड  यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त " आजादी का अमृत महोत्सव " या अभियानांतर्गत ९ नोव्हेंबर २०२१ रोजी, गाव मौजे रेटवडी (ता. खेड) या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ  खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील, मा. ग्रामपंचायत सदस्य किरण पवार, खंडू शेठ पवळे, अतुल थिटे, सुभाष हिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश वाबळे, अमित गोसावी, ग्रामसेवक सोमनाथ पारासुर, पतसंस्था व्यवस्थापक सुरेश पवार, दीपक वाबळे, यांच्या उपस्थितीत सरस्वतीच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून व  दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

सदर कार्यक्रमात खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. देविदास युवराज शिंदे पाटील, उपाध्यक्ष ऍड.गणेश गाडे, सचिव अँड. संदीप गाडे, ॲड. संदीप घुले,  ॲड.  संजय गोपाळे,  ॲड.  विजय रेटवडे, ॲड.  संदीप रेटवडे,  ॲड. अक्षय भोगाडे, तालुका बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय नवीन कार्यकारीणीचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य किरण पवार यांनी केला. यावेळी श्री किरण पवार यांनी प्रस्ताविक केले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील अध्यक्ष खेड तालुका बार असोसिएशन यांनी केले, सदर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  ॲड. संदिप रेटवडे साहेब यांनी केले, प्रमुख वक्ते ॲड. संदिप घुले साहेब  यांनी विधी साहित्य व कायदा या कायद्याबाबत  मार्गदर्शन केले, ॲड. संजय गोपाळे यांनी सातबारा या महसूली कायद्याविषयी मार्गदर्शन केले, अध्यक्षीय भाषण ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील खेड तालुका बार असो. यांनी केले. त्यावेळी शिंदे साहेब यांनी ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील एकत्र हिंदू कुटुंब पद्धती लोप पावत चाललेली असून आज भाऊ भावात, मुलगा आई वडीलात राहत नाही अशी परिस्थिती आहे, तसेच पती-पत्नीचे सुद्धा किरकोळ कारणावरून वाद होत असतात त्यामुळे आपण सर्वांनी कायदाचे ज्ञान घेऊन सगळे तंटे समपोचाराने सोडवावे असे आव्हान केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  ॲड. विजय रेटवडे यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या