एसटी कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन : संजय सावंत


श्रीगोंदा प्रतिनिधी 

सध्याचे सरकार महाविकास आघाडी सरकार नसून महा भकास आघाडी सरकार आहे. जनतेच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, यांच्याविरोधातील सरकार असून येणाऱ्या काळात या सरकारचा समाचार बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने घेतला जाणार आहे, असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष संजय सावंत यांनी केले.

श्रीगोंदा आगारामध्ये एसटी कामगारांच्या माध्यमातून 'लढा विलीनीकरणाचा' हे आंदोलन दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती चालू आहे. एसटी कामगारांनी ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. प्रशासन व राज्य शासन हे एसटी कामगारांच्या विविध मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही. तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याची भूमिका आहे. या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला. 35 एसटी कामगारांच्या मृत्यूला हे शासन जबाबदार आहे, शासनाचा धिक्कार करत शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांवर व भूमिकांवर सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले.

बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी महासंघ-परिवहण शाखा यांच्या वतीने आगारप्रमुख प्रवीण शिंदे यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले.

यावेळी उपस्थित संजय सावंत प्रदेश कार्याध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य, समीर शिंदे जिल्हाध्यक्ष, सुभाष बोराडे, शहराध्यक्ष शहानवाज इनामदार शहर उपाध्यक्ष, रामदास मले आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या