Breaking News

तीन पैश्यांचा तमाशा म्हणजे आजचे सरकार - आशिष शेलार



मुंबई : उद्धव ठाकरे यांची तब्येत लवकर बारी होऊ ही सदिच्छा, आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे झाली. हा कार्यकाळ नव्हे फक्त काळ झाला आहे. अशा शब्दात महाविकास आघाडीवर टीका केला.

पुढे ते म्हणाले आमचे महाविकास आघाडी सरकारशी वैर नाही. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वेदना मांडत आहोत. अशा शब्दात आशिष शेलारांनी टीका केली. 2 वर्षे सरकारला झाले. पण त्यांचे ध्येय काय? असा सवालही विचारण्यात आला आहे. हे सरकार फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्या भोवती फिरणारे सरकार, असं म्हणतं आशिष शेलारांनी नाव न घेता टीका केला आहे. 

आशिष शेलार म्हणाले तीन पैश्यांचा तमाशा हे प्रसिद्ध नाटक होते ,म्हणजे आजचे सरकार.  हे सरकार म्हणजे 2 वर्षात सत्ता आणि संपत्ती मिळावण्यासाठी 3 पैश्याच्या तमाशा आहे. हे सरकार म्हणजे 3 पैश्याचा तमाशा. जनतेला केंद्रित करण्यापेक्षा हे सरकार पुत्र पुत्री आणि पुतण्या या केंद्र स्थानी आहे, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. 

Post a Comment

0 Comments