लस घेतली असेल तरच मिळणार दारू
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लसीकरणाचे नियम प्रशासनाकडून आणखी कडक करण्यात आले आहेत. नागरिकांनी लस घेतली नसेल तर त्यांना मद्य खरेदी करता येणार नाही. लस न घेतलेल्यांना दारू मिळणार नाही, असा निर्णय औरंगाबाद शहर प्रशासनाने घेतला आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही शक्कल अवलंबण्यात आली आहे.नियमांचं उल्लंघन केल्यास दुकानं सील करण्यात येणार असल्याचा हि बोल जात आहे . पेट्रोल पंप, रेशन दुकानांनंतर आता लसीकरणाचं प्रमाणपत्र नसल्यास मद्य प्रेमींना दारू सुद्धा मिळणार नाही.
0 टिप्पण्या