शालेय विद्यार्थी करताहेत जीवघेणी कसरत
ढोरजळगांव
शेवगांव तालुक्यातील ढोरानदीतरी वसलेले सातशे लोकसंख्या आसलेले गांव स्वातंत्र्यानंतर ही आज या ग्रामस्थाच्या नशिबी पावसाळ्यात फरफटच दिसुन येत आसुन जुन ते डिसेंबर महिन्यात या गांवातील ग्रामस्थांना शालेय विद्यार्थाना शेतकऱ्यांना ढोरानदीच्या पाण्यातुन जीवघेणी वाट काढत तारेवरची कसरत करावी लागत आहे.
स्वातंत्र्यानंतरही गेल्या कित्येक वर्षापासुन या पुलाचा प्रश्न अनुत्तरीत असुन लोकप्रतिनिधी किती होऊन गेले ग्रामस्थांनीही वेळोवेळी प्रशासनाकडे लोकप्रतिनिधीकडे या पुलांची मागणी करूनही अजुनही हा पुल आजही दुलक्षितच आसुन आजही येथील शालेय विद्यार्थी व शेतकरी यांच्या पाणी पाचवीलाच पुजलेले असुन जुन महिना सुरू झाल्यावर येथील शेतक-याना बैल पाण्यात बुडत आसतानाही वाट शोधावी लागते तर शालेय विद्यार्थाना बंधा-यांच्या कठाडावरून जीवघेणी ये जा कसरत करावी लागत आहे.
पाण्यात पडुन जखीम व जीवितहनी कित्येक वेळा झाली असुन तरीही या दुलक्षित पुलांकडे आजही लोकप्रतिनिधीचे व पदाधिका-यांचे व प्रशासनाचे दुलक्ष दिसुन येत आहे शासनस्तरावर मुलभुत गर्जामध्ये दळणवळण रस्ते पुल ही महत्वाची गरज आसताना अजुनही या पुलांची वेळोवेळी मागणी करूही पुल झाला नसुन भविष्यात येथील शेतक-यांना ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थाना आदोंलनाचा आवलंब करण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही.
आपेगांव येथील पुलांची मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे केली असली तरी त्याकडे वेळोवेळी दुलक्ष करण्यात आले असुन शालेय विद्यार्थाना पुल नसल्यामुळे बंधा-यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर शेतक-यांना शेतीसाठी परीणामी पाण्यामधुन जीवघेणी कसरत करावी लागत आहे ही मोठी शोकांंतिका आहे.
- बाळासाहेब शेळके (शेतकरी)
आपेगांव गांवामध्ये जाण्यासाठी विद्यार्थी ,शेतकरी, व वयोवृध्द यांना पुल नसल्यामुळे व नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आसल्यामुळे ५ ते ६ किलो मीटर वरून गावामध्ये यावे लागत आहे. प्रत्येक्षात हा पुल जर झाला तर होणारी पायपीट व ससेहोळपट थांबणार असुन ५०० मीटर अंतर आसताना तीन गावे ओलडुंन गावात यावे लागते व वेळ खर्च होत आहे.
- रमेश वाघ (तरूण ग्रामस्थ)
0 टिप्पण्या