जवाहर विद्यालय चास येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा


खेड (ता.) प्रतिनिधी  

शाळेतल्या बाईंना आणि सरांना भेटण्याची उत्सुकता, आपल्या सवंगड्यांना शोधणाऱ्या नजरा, शाळेतल्या मंतरलेल्या दिवसांचा आठवणी, उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा मागोवा घेताना मनात दाटून येणाऱ्या आठवणी, जीवनाच्या प्रवासात स्थिरावल्यानंतर ‘बॅचमेट’ना भेटण्याची उत्सुकता अशा या वातावरणात जवाहर विदयालय चास येथे दहावी १९९५-१९९६ या बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी शिक्षक वाळुंज, होजगे व केंगारे तसेच लोखंडे व मुख्याध्यापक निमसे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी या बॅचचे सर्वच विध्यार्थी आयुष्यात यशस्वी जीवन जगत असून, कोण आदर्श शिक्षक तर कोण पोलीस खात्यात व महावितरण विभागात सेवा बजावत आहेत, तर कोणी व्यवसायाबरोबरच राजकारणात काम करत असून, बहुतेक विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात यशस्वी उदयोजक म्हणुन काम करत आहेत. तर काही जण अभिमान वाटावा असे भारतीय सेना दलात कार्यरत आहेत. शंकरराव मुळूक, शिवराज कपाळे, गणेश वाघुले, अरुण गुंडाळ, वैभव नाईकरे, कांता डांगले, मनीषा मुळूक, प्रमिला रणपिसे, ज्योती भांबुरे, संतोष गायकवाड, कैलास घनवट, सचिन घेवडे, महेंद्र गाढवे, किरण घनवट, जितेंद्र घनवट, विनायक राक्षे, संतोष औटी, लाला जाधव, काळूराम राऊत, संजय रासकर, सुनील वाळुंज, दत्तात्रय गायकवाड, सुशांत रणपिसे, सुनील कामठे, संतोष राऊत, संतोष तनपुरे हे निवडक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवराज कपाळे, गणेश वाघुले, अरुण गुंडाळ यांनी केले, प्रास्ताविक मनीषा मुळूक यांनी केले तर सुत्रसंचालन प्रसिध्द निवेदक कैलास दुधाळे यांनी केले, शंकरराव मुळूक यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या