संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स



मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत विवाहबंधनात अडकत आहे. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्स लक्ष वेधून घेत आहेत.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं

संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी डान्सनंतर वधूमाय वर्षा राऊत यांनाही बोलावलं. त्यानंतर लाजऱ्या-बुजऱ्या वर्षा राऊतांनी पतीसह डान्स केला. अनेकांनी दोघांच्या डान्सची तारीफ केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या