Breaking News

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी मनसेच्या वतीने


केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे चरण पूजा करून आंदोलन

 पाथर्डी प्रतिनिधी :

ज्या लोकसभा मतदार संघातून खा सुजय विखे पाटील यांनी लोकांची मते घेऊन लोकसेवेचा वसा घेतला त्याचा त्यांना विसर पडला आहे. अशी टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केले. पाथर्डी शहरातून जाणाऱ्या 61 राष्ट्रीय महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा रस्ता अर्धवट स्वरूपाचा आहे. याबाबत अधिकारी व पदाधिकारी गंभीर नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पाथर्डी येथील नाईक चौकात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पादुकाचे विधीवत पूजन करून चरण पूजन करून आंदोलन केले याप्रसंगी खेडकर बोलत होते.

 यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडू पाटील बोरुडे माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे, वंचित बहुजनचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के, अविनाश पालवे, अशोक आंधळे, शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, गणेश डोमकावळे, प्रविण शिरसाट, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना देविदास खेडकर म्हणाले की गेल्या सात-आठ वर्षांपासून हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय दैनी अवस्थेत आहे.

 अनेकांना वाटले होते राष्ट्रीय महामार्गापासून पाथर्डीच्या विकासाला चालना मिळेल. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग अनेकांचा मृत्यू मार्ग ठरला ग्रामीण भागात व शहरांमध्ये खरेदी करण्यासाठी येणारा माणूस या राष्ट्रीय महामार्ग मुळे इतर ठिकाणी जाऊ लागला आहे त्यामुळे पाथर्डी शहरातील बाजारपेठेवर या राष्ट्रीय महामार्ग मुळे मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे त्यामुळे आज व्यापारीवर्ग देखील हतबल झाला आहे. त्यामुळे शहरातील अर्थकरण थांबले गेले. आमचा आमदार, खासदार, यांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही पण तुमचे चुकीचे निर्णय आहेत याला आमचा विरोध असल्याचे खेडकर म्हणाले. शहरात याची दिवसभर चर्चा होती. यावेळी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments