INS विशाखापट्टणम नंतर आता INS Vela भारतीय नौदलात सामील होणार आहे, काय आहेत या पाणबुडीची वैशिष्ट्ये?



मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने युद्धनौका बांधकाम क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी आयएनएस विशाखापट्टणम भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले आणि आता नौदलाला कलवरी वर्गाची चौथी पाणबुडी, आयएनएस वेला ही मिळणार आहे. ही पाणबुडी 25 नोव्हेंबरला नौदलात दाखल होणार आहे.

आयएनएस वेला मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तयार करण्यात आली आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी आणि आयएनएस करंज भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुडींच्या तंत्रज्ञानावर बनवण्यात आल्या आहेत, ज्या जगातील सर्वोत्तम पाणबुड्यांपैकी मानल्या जातात.

INS Vela 75 मीटर



लांब आणि 1615 टन वजनाची आहे. यात 35 नौसैनिक आणि 8 अधिकारी बसू शकतात. ही पाणबुडी समुद्राखाली 37 किलोमीटर (20 नॉटिकल मैल) वेगाने धावू शकते. ही पाणबुडी समुद्राखालून एका फेरीत 1020 किमी (550 नॉटिकल मैल) अंतर कव्हर करू शकते आणि 50 दिवस समुद्रात राहू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या