Video : मुलांच्या भांडणावरून विधवा महिलेला जनावरासारखे मारले..!

 पाथर्डी :- लहान मुलांच्या भांडणावरुन माझ्या मुलाला का मारले असा जाब विचारणा-या विधवा महीलेला काठीच्या दांड्याने जनावरासारखे मारले. पहायला गाव जमा झाला. टाकळीमानुर गावात व्हीडीओ चित्रीकरण देखील झाले.

जनावरासारखे मारणा-या माणसाला अडविण्याची हिम्मत लवकर झाली नाही. शेवटी माणुसकीला पाझर फुटला भांडण सोडविले. पोलिस घरी जाताच संबधितांनी घराला टाळे ठोकले व पसार झाले. जनावरासारखे विधवेला मारहान करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला आणि पोलिस प्रशासानही कामाला लागले. मात्र तो पळालाच.सहा वर्षापुर्वी उसतोडणीचे काम करताना गोविंद कारंडे हे टँक्टरच्या टायरखाली सापडुन मयत झाले. त्यांची पत्नी शोभा कारंडे व मुले टाकळीमानुर गावात राहतात. शेजारीच राहणारा मिनीनाथ उर्फ नाथा खताळ याचे व कारंडे याचे लहान मुलांच्या कारणावरुन वाद झाले होते. सोमवारी शोभा कारंडे यांचा मुलगा कृष्णा याला नाथाचा मुलगा महादेव याने मारहान केली होती. त्यावरुन नाथानेही कृष्णाला मारहान केली होती. तुम्ही का मारहान केली असा जाब शोभाने नाथा खताळ याला विचारला. त्यावेळी हातामधे असलेल्या लाकडी दांडक्याने जनावराला मारतो तसे नाथाने शोभाला तुडविले. यामधे नाथाच्या पत्नीनेही शोभाला मारले. गाव जमा झाला होता पण दुरुन डोंगर साजरे सुरु होते. मारहानीची व्हीडीओ शुंटीगही सुरु होती. शोभा जनावरासारखी मार खात होती. अखेर माणुसकीला पाझर फुटला व काही लोक शोभाच्या मदतीला धावले.

पोलिस ठाण्यात येवुन मारहानीचे व्हीडीओ चित्रीकरण सादर केले. पोलिसांनी खताळ व त्याच्या पत्नीविरुद्ध  मारहान केल्याचा गुन्हा दाखल केला.. 

पोलिस नाईक ईश्वर गर्जे तपास,  करीत आहेत. . पोलिस टाकळीमानुर येथे गेले असता खताळ घराला कुलुप लावुन पळुन गेला होता. 

 नाथा खताळ हा आडमुठ्या स्वभावाचा आहे. मी महीला असुन माझी मुले लहान आहेत. पतीचे निधन झालेले आहे. नाथा खताळने यापुर्वी गल्लीतील अनेकांना मारहान करुन दमदाटी केलेली आहे. मला जिवे मारण्याची धमकी दिली असुन माझ्या जिवाला त्याच्यापासुन धोका आहे. मला संरक्षण मिळावे व खताळ याला अटक करावी

- शोभा कारंडे, पिडीतम हीला टाकळीमानुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या