Breaking News

जगातल्या 23 देशांमध्ये Omicron चा शिरकाव, भारताची स्थिती काय?नवी दिल्लीः ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात खळबळ माजवली आहे. आतापर्यंत तब्बल 23 देशांमध्ये या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विशेष म्हणजे कॅलिफोर्नियातील ज्या व्यक्तीला ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण या नव्या संकटापुढे कितपत तग धरेल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधावारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगातील 23 देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले असून या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.


कोणत्या देशात किती रुग्ण?

ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट अदिक संक्रामक असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. सर्वात आधी हा व्हेरिएंट आफ्रिकेत आढलून आला. त्यानंतर जगातील 23 देशांपर्यंत विषाणूचा फैलाव झालाय. कोणत्या देशात आतापर्यंत किती रुग्ण आढळले, 

दक्षिण अफ्रिका- 77 रुग्ण

यूके- 22 रुग्ण

बोत्सवाना- 19 रुग्ण

नायजेरिया- 16 रुग्ण

पोर्तुगाल- 13 रुग्ण

अमेरिका- 1 रुग्ण

ऑस्ट्रेलिया- 7 रुग्ण

ऑस्ट्रिया- 1रुग्ण

बेल्जियम – 1 रुग्ण

ब्राझील- 1 रुग्ण

कॅनडा- 6 रुग्ण

चेक रिपब्लिक- 4 रुग्ण

डेनमार्क- 4 रुग्ण

फ्रान्स- 1 रुग्ण

जर्मनी- 9 रुग्ण

हाँग काँग- 4 रुग्ण

इस्रायल- 4 रुग्ण

जापाना- 2 रुग्ण

नेदरर्लंड- 16 रुग्ण

नॉर्वे- 3 रुग्ण

सौदी अरब- 1 रुग्ण

स्पेन – 2 रुग्ण

स्वी़न- 3 रुग्ण

No comments