26 विद्यार्थ्यांवर वाचादोष शिबिरात मोफत शस्त्रक्रिया


राहाता :

ग्रामीण रुग्णालय राहाता येथे "राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम " अंतर्गत टंग टाय शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
जिल्हा रुग्णालयातील डॉ. गुरवले यांनी २६ विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या.
या शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. पी जी गुंजाळ,बालरोग तज्ञ डॉ. विजय म्हस्के, डॉ स्वाती म्हस्के, डॉ. शुभांगी कान्हे यांचे सहकार्य लाभले. रोटरी क्लब मार्फत विद्यार्थ्यांची जेवण नाश्ता ची सोय करण्यात आली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य" मधील वैद्यकीय अधिकारी डॉ दिनेश कदम, डॉ राजश्री गाडेकर, डॉ.वाल्मीक नेहे, डॉ. अमोल बेद्रे , डॉ.नितीन दरेकर, डॉ.ज्योती पवार,डॉ.स्नेहा लोखंडे, डॉ. अश्विनी मालकर, सर्व औषध निर्माता व परिचारिका यांनी तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाडी ला प्रत्यक्ष भेटी देऊन वाचा दोष , तसेच इतर जन्मतः  हृदय रोग, नाक कान, घसा चे  गंभीर आजार असलेले विद्यार्थी शोधून त्यांना ग्रामीण रुग्णालय राहाता येथे बोलावून शस्त्रक्रिया करवून घेतल्या.शिबिरासाठी गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे, कवडे,  दत्ता क्षीरसागर,  संतोष नरवडे, भावसार , बनकर, सोनार , गव्हाणे व  कुंभार्डे यांनी विशेष सहकार्य केले.

समारोप प्रसंगी ग्रीन अँड क्लीन शिर्डी चे जगताप यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप केले.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम " अंतर्गत विविध प्रकारच्या आजारांवर समुपदेशन,  उपचार , अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात त्याचा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ राजश्री गाडेकर यांनी केले आहे..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या