सीरम लसीचं उत्पादन 50 टक्के घटवणार



पुणे: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं पुढील आठवड्यापासून कोविशिल्डलसीचं उत्पादन 50 टक्केंनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही ऑर्डर नसल्याचंही सीरमकडून सांगण्यात आलं आहे. मागणी पेक्षा उत्पादन जास्त असल्यान कोविशिल्ड लसीची निर्मिती कमी प्रमाणात करणार असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आमच्याकडे केंद्र सरकारनं नोंदवलेल्या ऑर्डर्स पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण करणार असल्याचंही सीरमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं केंद्र सरकारला पत्र लिहून किती प्रमाणात लसी हव्या आहेत, यासंदर्भात माहिती हवी असल्याचं कळवलं आहे. सीएनबीसी 18 नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सीरम इन्स्टिट्य़ूट ऑफ इंडिया एका महिन्याला 25 ते 27 कोटी डोसची निर्मिती करते. पुनावाला यांनी ऑक्टोबरमध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये ते 24 कोटी डोसची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या