Breaking News

गृहमंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या गाडीची काच फोडली, 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रं चोरीलासातारा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलयांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून पैसे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाबासाहेब शिंदे  यांच्या कारमधून 50 हजार रुपयांची चोरी झाली. याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला गेल्याचा आरोप आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये लग्न सोहळ्यासाठी गेलेले असताना हा प्रकार घडला.

बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र गृह राज्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातच गृहमंत्र्यांच्या सचिवांचे पैसे चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे फलटण तालुक्यातील धुळदेव येथे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्नाहून निघाल्यावर कारकडे येत असताना गाडीची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याच वेळी कारमधील 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रंही गहाळ झाल्याचं त्यांना समजलं.

No comments