औरंगाबादः राज्यातील विविध शहरांमध्ये ओमिक्रॉन विषाणू आढळला असून आता मराठवाड्यातही त्याचा शिरकाव झाला. या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्ह्यांतील यंत्रणा अलर्ट झाली आहे. औरंगाबाद शहरातदेखील महापालिकेनेगेल्या काही दिवसांपासून युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. शहरात लसीकरणासंबंधीही व्यापक मोहीम राबवली जात आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तब्बल 650 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम वेगाने सुरु आहे. येत्या आठवडाभरात हे बेड्स उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
0 Comments