Big News : करीना, अमृत यांना कोरोनाची लागण: सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता

 


अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी कोरोना नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.

त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जातेय. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत.


बाँलिवूड पार्ट्यामुळे करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्रींना कोरोनाचा संसर्ग झालाय. करीना कपूर आणि अमृता अरोरा सूपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता, बीएमसीकडून वर्तवण्यात येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सातत्याने कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.


करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांचे आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केलीय. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्त केलीय. आज आणखी काही बॉलिवूड अभीनेते आणि अभीनेत्रींचे कोरोना रिपोर्ट येणार आहेत. करीना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची बीएमसीने कोरोना चाचणी केली आहे. त्यांच्या रिपोर्ट्सकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. ज्या मध्ये काही मोठ्या बॉलिवूड सूपरस्टारांची नावं असल्याची माहीती मिळतेय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या