इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीरमुंबई : विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे.  राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते. ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाब वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यात बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहवीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या