बंद कारखान्यात चोरी करणारे दोघे पकडले,

तर दोघे शस्त्राचा धाक दाखवून पसार


लोणी काळभोर :  

थेऊर (ता. हवेली) येथील बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या वर्कशॉपमधील लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघा अल्पवयीन चोरट्यांना सुरक्षारक्षकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर दोघे शस्त्रांचा धाक दाखवून पसार झाले आहेत. रविवारी (दि. 19) मध्यरात्री ही घटना घडली. 

रंगेहाथ पकडलेले दोन्ही अल्पवयीन चोरटे आहेत. तर तात्या देवकर, गोपाल उर्फ रोहन जाधव (दोघेही, जाधववस्ती थेऊरगाव) पसार झाले आहेत. या प्रकरणी दयानंद हनुमंत मोरे (वय 42 रा. चिखली, प्राधिकरण, पिंपरी- चिंचवड)  यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे  इंडियन फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस या सुरक्षा एजन्सीचे मॅनेजर आहेत.

फिर्यादीच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री चौघांच्या सशस्त्र टोळीने कारखाना परिसरात प्रवेश करून वर्कशॉपमधील उघडयावर असलेले लोखंडी साहित्य चोरून पोत्यात भरत होते. त्यावेळी चौघापैकी दोघांना सुरक्षारक्षकांनी रंगेहाथ पकडले.  तर दोघे सुरक्षा रक्षकांना शस्त्रांचा धाक दाखवून पसार झाले. 
सुरक्षा रक्षकांनी पकडलेल्या 2  अल्पवयीन चोरटयांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  लोणी काळभोर पोलीस तपास  करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या