कवी संमेलनाला रसिकांची दाद


आळंदी :
येथे तेजभूषण बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था,महाराष्ट्र संचालित रंगीन काव्यधारा साहित्य कला मंच यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खुले काव्यसंमेलन, तेजस्विनी बिऱ्हाडे यांचे "आवाज स्पंदनातील प्रातिनिधिक" काव्यसंग्रह" तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सारडा धर्मशाळा,आळंदी येथे आयोजित केले होते. 

संमेलनाचे उद्घाटन आळंदीचे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि नगरसेवक प्रकाश कु-हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संमेलनाध्यक्ष डाॅ.ख.र.माळवे, स्वागताध्यक्ष मो शकील ताज मो जाफरी उपस्थित होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे,माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले,अशोक उमरगेकर,ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,राष्ट्रीय कवी पुरुषोत्तम महाराज हिंगनकर,संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ भगीरथ,उपाध्यक्ष सुरेखा भगीरथ,सचिव भूषण बिऱ्हाडे,कोषाध्यक्ष तेजस्विनी बिऱ्हाडे उपस्थित होते.


कार्यक्रमात विविध कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली. शब्दालंकारांनी भरलेली ही मैफल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली.

संस्थेच्या वतीने तेजस्विनी बिऱ्हाडे आणि भुषण बिऱ्हाडे यांनी उपस्थित कवींचा प्रमानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या