नेवासे येथे राष्ट्रीय लोक अदालतला मोठा प्रतिसादनेवासे (प्रतिनिधी) -:- नेवासे येथील न्यायालयात भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये उच्चांकी तडजोडी झाल्या असून दोन कोटी बत्तीस लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणसाठ रुपयाचा वसूल झाला आहे.

शनिवार दि.१०/१२/२०२१ रोजी जिल्हा व अति.सत्र न्यायाधीश तथा नेवासा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.एम.तापकीरे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाले.सदर लोकन्यायालयात प्रलंबित दिवाणी दावे, ताडजोडयोग्य फौजदारी केसेस,मोटार अपघात नुकसान भरपाई दावे,चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणे यामध्ये वीज बिले, टेलिफोन,महसूल,पाणीपट्टी इत्यादी ५६६२प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.या पैकी ७७६ प्रकरणात यशस्वी तडजोड झाली.नगर जिल्ह्यात या दिवशी भरवण्यात आलेल्या लोकन्यायालयापैकी नेवासा येथिल लोकन्यायालयात चौथ्या क्रमांकाच्या तडजोडी झाल्याची माहिती साहाय्यक अधीक्षक सुनील लांबदाडे यांनी दिली.

वादातीत प्रकरणे मिटवण्यासाठी आठ पॅनल वर कामकाज चालले.पॅनल प्रमुख म्हणून स्वतः जिल्हा व अति.सत्र न्या.एस.एम.तापकीरे,दुसरे जिल्हा व अति.सत्र न्या.जी.बी.जाधव,न्या.बी.यु.चौधरी,न्या.श्रीमती एस.डी.. सोनी,न्या.श्रीमती बी.के.पाटील,न्या.श्रीमती ए.बी.निवारे,न्या.श्रीमती ए.एस.गुंजवटे, न्या.ए.ए.पाचरने यांनी तडजोडीसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या