पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


मांडवगण फराटा :


शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव येथे विज्ञान प्रदर्शन, वकृत्त्व स्पर्धा, गायन, चित्रकला रांगोळी, निबंध स्पर्धा आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामपंचायतीच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी इनामगावच्या सरपंच पल्लवी घाटगे, दत्तात्रय मचाले,संजय घाटगे, नानासो घाटगे, अनिल शिंदे,उत्तम शिंदे,अण्णासो नलगे,युवराज घाडगे, सौरस घाडगे,सुरज घाडगे,संजय घाटगे,नितीन गवळी,मुख्याध्यापक होलगुंडे, शिक्षक जाधव,मचाले, सुतार, शिक्षिका गायकवाड,बगाटे, मचाते, सावंत आदी उपस्थित होते.

फोटोओळ-इनामगाव (ता.शिरूर)येथे वृक्षारोपण करताना सरपंच पल्लवी घाटगे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या