तृतीयपंथीयांनी केली मतदार नोंदणी



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - 

राज्य निवडणूक आयोगामार्फत आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे 1 जानेवारी 2022 रोजी अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नविन मतदारांची नाव नोंदणी करण्याचे अभियान राज्यात सुरु आहे. 

श्रीरामपूर तालुक्यात प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील मधील मतदार नोंदणी जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे प्रमुख शकील बागवान तसेच संदीप पाळंदे यांनी आपल्या सहकार्‍यांसह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविल्याने अनेक मतदारांनी स्वयंप्रेरणेने मतदार नोंदणी करून घेतली आहे. या अभियानात गेल्या महिन्याभरामध्ये जवळपास दोन हजार नवीन मतदारांनी अर्ज भरून दिले असून या सर्वांची नोंदणी होणार आहे. मतदारांनी आपले अर्ज भरून दिले असून ते तपासून त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू आहे.
मतदार नोंदणी जागृती अभियानाचा परिणाम म्हणून शहरातील तृतीयपंथी मतदारांनी आज स्वयंप्रेरणेने आपली नावे तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेकडे नोंदविली. 

तृतीयपंथीयांचे प्रमुख दिशा शेख यांच्या नेतृत्वाखाली अकरा मतदारांनी तहसील मध्ये येऊन आपले मतदान नोंदणीचे अर्ज भरून दिले. याकामी या कक्षाचे प्रमुख शकील बागवान तसेच निवडणूक शाखेचे संदीप पाळंदे यांनी सदर अर्ज भरून व स्वीकारून या नोंदणीसाठी सहकार्य केले.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मुदत पाच डिसेंबर पर्यंत वाढविल्याने गेल्या आठवडाभरामध्ये तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने मतदान नोंदणी अभियानासाठी जनजागृती मोहीम राबवली.

 त्याचे परिणाम स्वरूप शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने नवीन मतदारांनी नोंदणी केली असून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागातील स्थलांतरित झालेल्या मतदारांनी देखील आपले अर्ज भरून दिले आहेत. शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी ही निवडणूक शाखेतील संदीप पाळंदे व त्यांचे सहकारी मतदार नोंदणीसाठी कार्यरत आहेत. प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मतदार नोंदणी मोहीम मतदारांपर्यंत पोहोचून श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हे अभियान होत आहे.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या