अँड. पांडुरंग जगताप यांची मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड


भिगवण :


येथील अँड. पांडुरंग जगताप यांची मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा दक्षिण विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मोरगाव (ता. बारामती) येथील कार्यक्रमात केली. जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेले अँड. पांडुरंग जगताप हे मराठा महासंघाचे मागील वीस वर्षापासून सक्रीय कार्यकर्ते असून भिगवण येथील छत्रपती शिवराय वाचनालयाचे अध्यक्ष आहेत.

 भिगवणमध्ये  20 वर्षापासून चालु असलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यान मालाचे भिगवण मराठा महासंघ शाखेच्या वतीने आयोजन करण्यात येते. त्यामधे ते सक्रिय सहभाग घेतात. निवडीबाबत बोलताना अँड. जगताप यांनी सांगितले की, जिल्हाभरात मराठा समाजाचे संघटन करून मराठा समाज घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेद्वारे प्रयत्न करणार आहे. तसेच मराठा महासंघाची ऐक गाव ऐक शाखा ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यानी सांगितले.

  या वेळी गुलाब गायकवाड, श्रीतीका पाडुले, युवराज दिसले, राजकुमार मस्कर, विक्रम पवार, ॲड.प्रिंयका काटे, प्रवीण पवार, आबासाहेब सोनवणे तसेच मराठा महासंघाचे शेकडो कार्यकर्ते हजर होते .
भिगवण परिसरातील नेते, कार्यकर्ते यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या