सोयाबीन चोरणारे दोघे अटकेत


कोपरगाव-(प्रतिनिधी)

बाजार समितीच्या आवारातून  12 गोण्या सोयाबीन चोरून नेणाऱ्या दोघांना कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव बाजार समितीच्या आवारात दि.०३ डिसेंबर सकाळी ९ वाजता एक छोटा हत्ती या रिक्षातून एका चोरट्याने बारा गोण्यात भरलेले ३० हजार रुपये किमतीचे बारा गोण्या सोयाबीन भरून परागंदा झालेला भामटा ज्ञानेश्वर दादा सोनवणे यास कोपरगाव शहर पोलिसांनीं अटक करून त्याच्या ताब्यातील ३० हजार रुपयांच्या बारा गोण्या व २.५० लक्ष रुपयांचा छोटा हत्ती असा ०२ लक्ष ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.या प्रकरणी कोपरगाव बाजार समितीचे सचिव नानासाहेब सोपान रणशूर यांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आरोपीस ताब्यात घेतल्यावर त्याने तो माल ज्या व्यापाऱ्यास विकला होता त्याकडून काढून दिला आहे.

त्या संबंधी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली असता सदरची रिक्षा ही धारणगाव येथील संशयित आरोपी ज्ञानेश्वर सोनवणे याची असल्याचे लक्षात आले होते. त्यांनी आरोपीला धारणगाव येथुन जेरबंद केले, मुद्देमाल मात्र ताब्यात मिळाला नव्हता.

 तो छोटा हत्ती, त्यातील बारा गोण्या सोयाबीन असा २ लक्ष ८० हजारांचा ऐवज नुकताच पोलिसानी पोहेगाव येथून जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ डी.आर.तिकोणे,पो.ना.दारकुंडे,पो.कॉ.ढाकरे,यांनी फुटेज तपासणी करून आरोपी ताब्यात घेतला आहे.

त्याला नुकतेच कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायाधीश डोईफोडे यांचे समोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे हे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या