पद्मभूषण राहीबाई पोपरे यांच्या हस्ते बेनकेंचा सन्मान


मांडवगण फराटा : 


सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या बँकेच्या संचालकपदी बहुमताने निवड झाल्याने राळेगणसिद्धी येथे एका कार्यक्रमात राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मभूषण स्विकारलेल्या राहिबाई पोपरे यांच्या हस्ते तुकाराम बेनके यांचा सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी संस्थेच्या कारभाराची माहिती घेतली. संस्थेचे एकूण एकोणविस संचालक मंडळ आहेत पुणे जिल्ह्यातील सुधाकर जगदाळे आणि तुकाराम बेनके हे दोन संचालक निवडून आलेले आहेत. लोणावळा, नारायणगाव, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सासवड व इंदापूर अशा सहा शाखा असून राज्यात एकूण बावीस शाखा आहेत. तज्ञ संचालक जे. आर. पाटील व चेअरमन चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा कारभार पारदर्शक व प्रगतीपथावर आहे अशी माहिती संचालक तुकाराम बेनके यांनी राहिबाई पोपरे यांना सांगितली. महाराष्ट्र राज्यात अग्रेसर असलेल्या या पतसंस्थेचे राहिबाई पोपरे यांनी कौतूक केले. याप्रसंगी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य के सी मोहिते, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, मुख्याध्यापक रामनाम इथापे, संतोष शेळके, शिरुर तालुका पर्यावरण अध्यक्ष राजाराम ढवळे, सचिव संतोष परदेशी इ. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या