ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती करून घेणे काळाची गरज - ॲड. तुषार झेंडे


मांडवगण फराटा :

" ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती करून घेणे काळाची गरज असल्याचे मत राज्य ग्राहक संरक्षण परिषद मंत्रालय मुंबईचे सदस्य ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी केले.                      

अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कार्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन प्रबोधन सप्ताहाची सुरुवात मौजे मांडवगण फराटा ता. शिरूर   माऊली मंदिर येथे झाली या उद्घाटन कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते. 24 डिसेंबर 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्यात नव्याने बदल करून 20 जुलै 2020 रोजी नवीन ग्राहक संरक्षण  कायदा अमलात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये बोलताना ग्राहकांचे हक्क व कर्तव्य विषयी त्यांनी माहिती दिली.
तसेच ग्राहकांनी दिशाभूल व  आक्षेपार्ह जाहिराती पासून सावध राहिले पाहिजे. झालेल्या फसवणुकीबद्दल तक्रार केली पाहिजे. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा आयोग, राज्य आयोग, व राष्ट्रीय आयोग, या तीनही आयोगामध्ये ग्राहकाला आपल्या झालेल्या फसवणुकीची दाद मागता येते. याशिवाय ग्राहक संरक्षण परिषदेत बाबत ही त्यांनी माहिती नागरिक व विद्यार्थी यांना दिली अन्नसुरक्षा कायदा बाबतही त्यांनी माहिती दिली याबाबत काही तक्रार असल्यास 1800 222 365 या टोल फ्री हेल्पलाईन वर ऑनलाइन तक्रार करण्याची माहिती दिली .
एमआरपी पेक्षा जास्त रक्कम जर विक्रेत्यांनी घेतली तर याबाबत ग्राहकाने 98 69 69 16 66 या व्हाट्सअप नंबर वर तक्रार करण्यास सांगितले.   दिलीप निंबाळकर जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा यांनी ग्राहक पंचायतीची स्‍थापना व कार्यपद्धती सिद्धांत याबाबत माहिती दिली .अध्यक्षीय भाषणामध्ये मदन फराटे यांनी ग्राहक पंचायती मुळे ग्राहकांची जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली असून होणाऱ्या फसवणुकीस  मोठ्या प्रमाणात  आळा बसला आहे. याशिवाय ग्राहक पंचायतीची  मुहूर्तमेढ मांडवगण फराटा इथून झाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास अध्यक्षपदी मदन  फराटे हे होते. यावेळी तुकाराम  फराटे सदस्य  जिल्हा कार्यकारिणी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते, संतोष परदेशी, तसेच वनाधिकारी विशाल चव्हाण,  नवनाथ गांधले, ॲड. लक्ष्मण बापू फराटे,  अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा  संघटनमंत्री  संपत फराटे.  सहसंघटक पंडित मासळकर,  कोषाध्यक्ष नामदेव चव्हाण, अविनाश ढवळे विकास फराटे भगीरथ परभाने, अशोक मोरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप व सूत्रसंचालन संपत नाना फराटे यांनी केले कार्यक्रमाचा समारोप ॲड.लक्ष्मण बापू फराटे यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या