संजय राऊतांच्या जीभेचं संशोधन झालं पाहिजे : राणेभाजप आमदार नितेश राणे  यांनी शिवसेना खासदार संजय राऊत  यांच्यावर टीका केली आहे. महिला अत्याचारावरुन शिवसेनेला देखील त्यांनी सुनावलं आहे. आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे. संजय राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं असं माझं मत आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपलं गुरू मानू नये आणि बोलू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

राऊत यांनी हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम रहावं आणि पोलिसांचा गराडा बाजूला करावा, मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांना दाखवेल, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या