ज्याची प्रतिमा चांगली त्यांनाच उमेदवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार


बारामती :

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीबद्दल बरीच चर्चा आहे. अनेकजण वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. मात्र ही निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार आहोत. त्यामुळे या निवडणूकीत योग्य उमेदवारांनाच संधी दिली जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

माळेगाव येथील राजहंस संकुलाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना अजित पवारांनी माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीबद्दल भूमिका स्पष्ट केली. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे, ज्याची लोकांमध्ये प्रतिमा चांगली आहे अशाच लोकांना माळेगाव नगरपंचायतीमध्ये उमेदवारी दिली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माळेगाव नगरपंचायतीची आगामी निवडणूक ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवली जाणार आहे. सतरा जागांवर उमेदवार देताना निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच संधी दिली जाणार आहे. माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीबद्दल बरीच चर्चा आहे. अनेकजण वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. मात्र ही निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार आहोत. त्यामुळे या निवडणूकीत योग्य उमेदवारांनाच संधी दिली जाईल, असे अजित पवार यांनी जाहिर केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या