पुण्याच्या कर्डेलवाडी शाळेची ‘एनसीईआरटी'ला भुरळ!

३६५ दिवस भरणाऱ्या या शाळेचा करणार अभ्यास


रांजणगाव गणपती:

सुट्टीला कायमचीच सुट्टी दिलेल्या म्हणजे '३६५ दिवसांची शाळा 'म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळालेल्या पुणे जिल्ह्यातील कर्डेलवाडी या छोट्याशा जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेच्या  अद्भुत कामाची दखल राष्ट्रीय शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन परिषदेने (एनसीईआरटी) घेतली आहे.
या परिषदेचे पथक कर्डेलवाडी शाळेच्या 'वर्षभर शैक्षणिक कार्य' या पॅटर्नचा अभ्यास करणार आहे. 'एनसीईआरटी'च्या शैक्षणिक सर्वे विभागाच्या प्रमुख प्रा. इंद्राणी भादुरी यांनी या सर्वेसाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे परवानगी मागितली असून, संस्थेचे प्रतिनिधी डॉ. विशाल पाजनकर यांच्यासह संस्थेतील तज्ज्ञांचे पथक पुढील महिन्यात जानेवारी अखेरीस या शाळेचा, तेथील शैक्षणिक स्थितीचा, उपक्रमांचा अभ्यास करणार आहे. 
या सर्वेचा एकत्रित अहवाल परिषदेकडून केंद्र सरकारला सादर केला जाणार असून, त्यातून शिक्षण क्षेत्रात काही सार्वत्रिक सुधारणा व
बदल होण्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पुणे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना याबाबत पूर्वतयारी करण्यासाठी पत्रव्यवहार केला असून एनसीईआरटी पथकाला 20 जानेवारी नंतर अभ्यास दौरा करण्यास सहमती दर्शवली आहे. अशी माहिती राज्य प्राथमिक उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पहिल्या लाॅकडाऊन काळात म्हणजे मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात शाळेचे कामकाज ऑफलाइन बंद होते. मात्र ऑनलाइन सुरू होते. हा अपवाद वगळला तर ही शाळा वर्षभरात कधीच सुट्टी घेत नाही, म्हणजे या शाळेने सुट्टीला कायमची सुट्टी दिली आहे.

पथक असा करणार सर्वे
या सर्वेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व परिसरात वास्तव्यास राहणार असून, या गुणवत्तेबरोबरच शाळेत राबविले सर्वेतून शाळेचा सार्वत्रिक अभ्यास केला जाणारे शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रम, जाणार आहे. शाळेतील व परिसरातील
शिक्षकांकडून राबविली जाणारी शिक्षण वातावरण, ३६५ दिवस विद्यार्थ्याच्या पद्धती, पालकांचा शैक्षणिक कार्यातील उपस्थितीमागील कारणे, शिक्षकांचे कार्य,सहभाग, परिसरातील स्वयंसेवी व त्यांची विद्यार्थ्यांप्रती भूमिका, शासकीय सामाजिक संस्थांकडून शाळेतील शालेय योजनांची अंमलबजावणी उपक्रमांस मिळणारे पाठबळ, माजी शालाबाह्य उपक्रमांची माहिती
विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे दायित्व घेण्याबरोबरच या सर्वेतून शाळेतील याबाबत बारीक सारीक माहितींच्या नोंदी अध्यापन प्रक्रियेचे मूल्यमापन केले जाणार तसेच घेतले जाणार आहेत. या सर्वेसाठी 'एनसीईआरटी'चे पथक महिनाभर शाळेत अभ्यासासाठी येणार असल्याचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

वीस वर्षांत अशी बदलली शाळा
या शाळेची सन २००१ पूर्वीफारशी प्रगती नव्हती.दत्तात्रय सकट व बेबीनंदा सकट या कल्पक व प्रयोगशील शिक्षक दांपत्याची या शाळेत बदली झाल्यानंतर त्यांनी झपाटून काम केले. मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीची डागडुजी करून रंगरंगोटी केली. शाळा परिसरात फुलझाडे लावली.स्वतःच्या पगारातून मुलांसाठी शौचालय उभारले. त्यातून मुलांचा व पालकांचाही शाळेकडे ओढा वाढला. शैक्षणिक गुणवत्ता सुधरविण्याच्या उद्देशाने सकाळी आठ ते सायंकाळी सहा, अशी अधिकची वेळ शाळेसाठी ठेवली. त्यातून शिक्षणाचा स्तर सुधारल्यानंतर शिक्षणेतर उपक्रमांवर भर दिला.त्यातून प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागताना अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवर झळकण्यास सुरवात झाली. सुंदर व एकसारखे हस्ताक्षर, स्वयंअध्ययन, स्वयंशिस्त यातून नावारूपाला आलेल्या या शाळेला जिल्हा परिषद व राज्य शासनाचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला; तर बेबीनंदा सकट यांना
आदर्श शिक्षकांसाठीच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यातूनच शाळेच्या प्रगतीची घोडदौड सुरू झाली व सणसमारंभही शाळेतच साजरे करण्यास सुरवात केल्याने विद्यार्थ्यांची ३६५ दिवस शंभर टक्के उपस्थिती दिसू लागली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या