अष्टविनायक मार्गांवर माहिती फलकांचा अभाव, प्रवाशांची होते दिशाभुल


पाटस :

 दौंड तालुक्यातून गेलेल्या अष्टविनायक मार्गावर पाटस हद्दीत गावांची दिशादर्शक, सांकेतिक चिन्ह याची माहिती फलकांचा अभाव आहे. परिणामी अष्टविनायक मार्गावर प्रवास करणा-या अनेक प्रवासांची व 

भक्तांची मोठी गैरसोय होत असून दिशाभुल होत असल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने पाटस हद्दीत माहिती फलक लावण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.  
    राज्यातील अष्टविनायक गावांना जोडणाऱ्या प्रमुख महामार्ग हा दौंड तालुक्यातील अनेक गावांमधून गेला आहे.  मोरगाव,राजणगांव आणि सिध्दटेक या अष्टविनायक गावांना हा मार्ग जोडला गेला आहे. मोरगाव ते दौंड तालुक्यातील पडवी, कुसेगाव, पाटस, पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग दौंड ते सिध्दटेक तर रांजणगाव राहु,पारगाव,नानगाव,कानगाव दौंड ते सिध्दटेक असा हा मार्ग दौंड तालुक्यातून जात आहे. या अष्टविनायक मार्गाचे काम तालुक्यातील अनेक गावांमध्ये बहुतांश ठिकाणा पुर्णतत्वाकडे गेले आहे. सध्या मोरगाव,पडवी,कुसेगाव,पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस व दौंड ते सिध्दटेक मार्गावर कुसेगाव पाटस रोडवर पाटस हद्दीत अष्टविनायककडे जाणारा गावांची नावे, अंतर, सांकेतिक चिन्ह व दिशादर्शक असणारे फलक नाहीत. पाटस हद्दीतील भीमा पाटस कारखाना चौकात मोरगावकडून सिध्दटेक कडे जाणारे व प्रवाशी व सिध्दटेककडून मोरगावकडे जाणारा प्रवाशांना याठिकाणी आल्यावर नेमके कोणत्या दिशेला जायचे याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक नागरीकांना विचारपुस करून पुढील प्रवास करण्याची वेळ येते. तसाच प्रकार हा पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्याजवळ होतो. पाटस टोल नाक्याजवळ पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर ही दौंडला जाणारा बाजुकडे याठिकाणी स्वागत कमान सारखे माहीती फलक लावण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी ही गावांची माहिती फलक व सांकेतिक चिन्हांचे फलक नसल्याने अनेक प्रवाशांना टोल नाक्यावरून टोल भरून पुढे जावे लागते त्यानंतर आपण चुकीचे दिशेने गेल्याचे प्रवाशांच्या लक्षात येते. 
     या प्रकारामुळे अष्टविनायक मार्गावर दर्शनासाठी जाणारे अनेक प्रवाशांची दिशाभुल होत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अष्टविनायक मार्गाचे काम करणा-या संबंधित विभागाच्या अधिका-यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून पाटस हद्दीतील कारखाना चौक व पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्याजवळ दौंड बाजुकडे जाणारा रस्त्यावर असा प्रकारचे माहिती फलक व सांकेतिक चिन्ह लावण्याची मागणी प्रवाशी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या