गावाकऱ्यांना निर्भीड मत मांडण्यासाठी सूचना पेटी


दौंड  :

एखाद्या गावचा सरपंच विधायक भुमीका घेऊन जन हितावह कामे करू लागल्यास ते गाव सुधारणा व प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र मिरवडी येथील सरपंच सागर शेलार यांनी निर्माण केल्याची चर्चा तेथील जन सामन्य आदराने करीत आहेत.
दौंड तालुक्यातील मिरवडी येथील ग्राम पंचायत यांनी लोकांना आपली सूचना वा तक्रार बिनधास्त पणे करता यावी, यासाठी सूचना पेटी बसवली आहे.
याबाबत सरपंच सागर शेलार म्हणाले, अन्य गावाप्रमाणे येथेही दोन गट आहेत, यामुळे विरोधी लोकांना सूचना करणे वा तक्रार करणे जमत नाही, गाव विकासात सर्वांचे म्हणणे महत्वाचे आहे, कोणालाही कोणतीही सूचना करावयाची , वा तक्रार करावं याची त्यांनी ती सूचना पेटीत टाकावी. दर आठवड्याला पेटी उघडून या सूचना वा तक्रार ही कोणाबद्दल गैर समज न ठेवता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सरपंच म्हणून मिळालेल्या कालावधीत गावच्या हितावह आणि विकासासाठी सर्वानाच बरोबर घेऊन वेळ आलेस पदर मोड करून काम करीत राहील, असे नमूद केले आहे.
बसवलेल्या सूचना पेटीचे गावातील सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या