संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हानवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात राजधानी दिल्लीतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावतयांनी तक्रार दाखल केली होती.  राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा” असं राऊत म्हणाले होते. आता राऊत यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या