गुंड परिवाराच्या वतीने आईच्या स्मृतीपित्यार्थ रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा


आळंदी : 

आदर्श माता स्व.मैनाबाई ज्ञानोबा गुंड यांच्या स्मृतीपित्यार्थ त्यांचे चिरंजीव केळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष गुंड,बाळासाहेब गुंड,विकास गुंड,राहुल गुंड,काळूराम गुंड आणि सन्मार्ग फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आईच्या दशक्रिया विधी निमित्ताने सर्व सामान्य रुग्णांची रुग्णवाहिके अभावी होणारी हेळसांड थांबवावी त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना व्हावा यानिमित्ताने आदर्श माता स्व.मैनाबाई ज्ञानोबा गुंड यांच्या स्मृतीपित्यार्थ उदात्त हेतूने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी उद्योगपती संजय मोहीते,सभापती अरुण चौधरी,माजी सभापती विलास कातोरे,माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे,माजी जिल्हाप्रमुख राम गावडे,नगरसेविका निर्मला गायकवाड,नगरसेवक पंकज भालेकर,माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड,आनंद मुंगसे,राजेंद्र गिलबिले,माजी सरपंच सोमनाथ मुंगसे,दिलीप मुंगसे,अमोल विरकर,पांडुरंग मुंगसे,दत्तात्रय मुंगसे,पोलीस पाटील युवराज वहिले,पांडुरंग म्हस्के,हभप संदीप महाराज लोहार,संग्रामबापू भंडारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत गुंड परिवाराच्या वतीने पुढील काही काळामध्ये वैकुंठरथचा सुध्दा लोकार्पण सोहळा होणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गुंड यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या