अष्टविनायक मार्ग पहिल्याच वर्षात उखडला

अनेक ठिकाणी खड्डे


पाटस : 

दौंड तालुक्यातून गेलेल्या अष्टविनायक मार्ग हा पाटस ते दौंड पर्यंत अनेक ठिकाणी उखडला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याचे चित्र आहे. बारा महिन्याच्या आतच या मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत. यावरून या कामाचा दर्जा लक्षात येत आहे. अष्टविनायक मार्गवर खड्डे पडू लागल्याने वाहनचालक व ग्रामथ नाराजी व्यक्त करीत आहेत.  
    राज्यातील अष्टविनायक गावांना जोडणाऱ्या प्रमुख महामार्ग हा दौंड तालुक्यातील अनेक गावांमधून गेला आहे.  मोरगाव,राजणव आणि सिध्दटेक या अष्टविनायक गावांना हा मार्ग जोडला गेला आहे. मोरगाव ते दौंड तालुक्यातील पडवी, कुसेगाव, पाटस, पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग दौंड ते सिध्दटेक तर रांजणगाव राहु,पारगाव,नानगाव,कानगाव दौंड ते सिध्दटेक असा हा मार्ग दौंड तालुक्यातून जात आहे. या अष्टविनायक मार्गाचे काम तालुक्यातील अनेक गावांमध्ये बहुतांश ठिकाणा पुर्णतत्वाकडे गेले आहे. मात्र सध्या पाटस ते दौंड या मार्गावर हा रस्त्याचे काम निकृष्ट पध्दतीचे झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या रस्ता अनेक ठिकाणी खचला असून उखडला आहे. रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही दिवासांपुर्वी या संबंधित ठेकेदाराने बिरोबावाडी ते बेटवाटी दरम्यान खड्डे पडले होते हे खड्डे बुजविण्यात आले होते. आता या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाटस ते दौंड पर्यंत अष्टविनायक मार्गाच्या रस्त्याचे काम जवजवळ पुर्ण झाले असून दौंड जवळील दोन ओढयांच्या पुलांचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी काम राहिले आहे. 
    दरम्यान, याबाबत अष्टविनायक मार्गाचे काम पाहणारे संबंधित उपकार्यकारी अभियंता नगराळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाटस ते दौंड रस्त्याचे काम अद्याप पुर्ण नाही. पहिल्या टप्याचे काम झाले असून दुसरा टप्यात या रस्त्यावर डांबरीकरणाचा दुसरा स्तर पडणार आहे. या रस्त्याची पाहणी करून खड्डे पडले असेल तर त्याची दुरूस्ती केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या