फराटे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ


मांडवगण फराटा : 


येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्वागत समारंभ आयोजीत करण्यात आला होता. अशा या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव  फराटे पाटील, संस्थेच्या संस्थापक सचिव मृणाल फराटे पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आजच्या काळात चांगले चारित्र्य वर्तन व कष्ट करण्याची तयारी अंगी असेल तर विद्यार्थी नक्की यशस्वी होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे गुण अंगी बाळगून चिकाटीने प्रयत्न करावेत आणि यशाची पायरी चढावी.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे,पाटील संस्थापक सचिव मृणाल फराटे पाटील, प्राचार्य प्रवीण कुरुमकर, प्राचार्य संदीप कोकरे,प्राचार्य हेमंत कांबळे, प्राचार्य विवेक सातपुते, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती नागवडे व कार्यक्रमाचे आभार पवन जगदाळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या