Breaking News

नायजेरीयाहून श्रीरामपुरात आलेल्या ‘त्या’ दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह



श्रीरामपूर :- नायजेरिया येथून श्रीरामपुरात आलेले मायलेकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यांचेवर श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघांचेही सॅम्पल ओमियोक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.

नायजेरियाहून आलेली 40 वर्षीय आई व तिचा सहा वर्षाचा मुलगा हे दोघे श्रीरामपूर येथे शहरातील शिवाजीरोड परिसरात आले. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास मिळताच त्यांनी या दोघांची करोना चाचणी केली असता या दोघांचेही अहवाल करोना पॉझिटीव्ह आले. त्यानुसार या दोघांनाही उपचारासाठी श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या मायलेकांची ओमिक्रॉन सॅम्पल तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती श्रीमती देशमुख यांनी दिली. परदेशातून आतापर्यंत 35 जण श्रीरामपुरात आले आहेत. या सर्वांची तपासणी केली असता परदेशातून आलेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक निगेटीव्ह आढळून आले आहेत. 

1 comment: