संविधान दिनी जयहिंद लोकचळवळला पुरस्कार


संगमनेर प्रतिनिधी 

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदृढ समाजनिर्मिती साठी विधायक आणि प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या जयहिंद लोकचळवळला संविधान दिनानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संविधान दिनानिमित्त 'संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रुप' यांच्या वतीने महाराष्ट्रातील नामांकित 75 संस्थांचा गौरव करण्यात आला.

बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात युवक क्रांती दलाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, कला प्रसारिणी सभेचे सचिन इटकर आणि अ. भा. चित्रपट महामंडळांच्या संचालिका श्रीमती निकिता मोघे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.जयहिंद लोकचळवळ चे  प्रमुख समन्वयक संकेत मुनोत यांनी हा गौरव स्वीकारला.

जयहिंद लोकचळवळ च्या वतीने यावर्षी गांधी जयंती निमित्त जागतिक परिषद घेण्यात आली होती. ज्यात जगभरातून अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. सध्याच्या वाढत्या द्वेषाच्या आणि हिंसेच्या वातावरणात गांधीविचारांद्वारे कसे प्रेम  आणि अहिंसा वाढवता येईल आणि ते आज कसे अनुकरणीय आहेत, सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कसे देता येईल, महिलांचा सहभाग वाढवून  राष्ट्र कसे बलशाली करता येईल. यावर जगभरातील मान्यवरांनी आपले विचार मांडले. जयहिंद लोकचळवळीने 12 गावे दत्तक घेऊन त्यात शेती, पाणी, आरोग्य आणि वेगवेगळ्या विषयांवर कार्य केले आहे. आमदार डॉ सुधीर तांबे यांनी 25 वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या