खेड प्रतिनिधी :
राजगुरुनगर येथील भीमातीरी श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन मंडळाच्या वतीने शुक्रवार (दि. १७) ते रविवार (दि. १९) पर्यंत करण्यात आले होते.
यानिमित्त शुक्रवार (दि. १७) रोजी सकाळी ८ वाजता आभिषेक व महापूजा करुन उत्सवास सुरुवात झाली.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार (दि.१८) रोजी सकाळी श्रींना अभिषेक व महापूजा करण्यात आली.
रविवार (दि. १९) रोजी दुपारी ३ वाजता श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सामुदायिक मंत्रजप होवून सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती होऊन प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष प्रताप आहेर, कार्याध्यक्ष रविंद्र जोशी, उपाध्यक्ष नथुराम तनपुरे, खजिनदार हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, अविनाश नाणेकर, रविंद्र सांडभोर, अजित डोळस यांनी केले होते. तर नारायण जाधव, समीर आहेर, बाबा साळुंके, ऍड. गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे, कमल पिसाळ, कुसुम तनपुरे, जनाबाई सैद आदी गुरू बंधूं- भगिनींच्या सहकार्याने उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

0 टिप्पण्या