नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्णनाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण सापडला असून, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेच्या माली देशातील एका खासगी कंपनीमध्ये काम करणारी ही व्यक्ती आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता या रुग्णाचा अहवाल पुण्याच्या लॅबकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या कोरोना चाचण्यात करण्यात येत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या