इम्रान खान यांच्या आत्महत्येची मी वाट पाहतोय, नवाज शरीफ?
इस्लामाबादः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आत्महत्या करावी, असे वाटतेय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना. मी इम्रान खान यांच्या आत्महत्येची वाट पहातोय, असे म्हणत त्यांनी थेट ब्रिटनमधून त्यांच्यावर निशाणा साधलाय. लाहौरमध्ये पाकिस्नान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) पक्षाने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शरीफ यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी हे तोंडसुख घेतले.

नवाज शरीफ म्हणाले, क्रिकेटमधून राजकारणात आलेले इम्रान खान म्हणतात की, आंततराराष्टरीय नाणेनिधीत जाण्याऐवजी आपण आत्महत्या करू. मग ते असं कधी करणार, याची वाट आम्ही पहात आहोत. भारतात इम्रान यांना चक्क कठपुतळी म्हटले जाते. अमेरिकेत तर त्यांना महापौरापेक्षाही कमी अधिकार असल्याचे म्हटले जाते. हे यासाठीच की साऱ्या जगाला माहितीय, त्यांना सत्तेत कसे आणले ते. इम्रान सर्वसामान्यांच्या मतावर सत्तेत आले नाहीत. त्यांनी सैन्याच्या मदतीने सत्ता मिळवली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या