ओमिक्रॉनने टेंशन वाढवलं, राज्यात लवकरच नव्या गाईडलाईन्सकर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे महाराष्ट्राचं टेंशन वाढलं आहे. कारण गेल्या काही दिवसात मुंबईत ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा तब्बल 2668 जण दाखल झालेत. विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे. या समस्येला तोडं देत असनाताच आता बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात तसेच महाराष्ट्रातही सर्वत्र हवामान बदलले आहे आणि विविध भागांमध्ये सतत पाऊस, वादळी वारे अशी परिस्थिती आणि तापमानात घट झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या