शर्यतीला सशर्त परवानगी


निरगुडसर :


गेल्या चार वर्षांपासून बंद असलेल्या बैलगाडा शर्यती ला आज उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्याने अनेक ठिकाणी शेतकरी बैलगाडा मालक यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर, शिंगवे, निरगुडसर, घोडेगाव या ठिकाणी सर्व पक्षीय  कार्यकर्त्यांनी चौकाचौकात एकत्र येत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्यात महाविकास आघाडीचे मोलाचे योगदान असल्याचे सेना ,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलत आहेत.

दरम्यान बैलगाडा शर्यती ला परवानगी मिळाली असून या शर्यती भरवल्या नंतर काही नियम व अटींचे पालन बैलगाडा मालकांना करावे लागणार आहे. बैलगाडा मालकांनी या नियमांचे पालन करूनच शर्यती भरवाव्या असे आव्हान बैलगाडा संघटना च्या वतीने करण्यात आले आहे.

या अटी पाळाव्या लागणार


- जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज करावा
- एक समिती बैलगाडी ट्रॅकची पाहणी करणार
- १ हजार मीटर पेक्षा मोठा ट्रॅक चालणार नाही
- ४८ तासात वेटरनरी डॅाक्टरांकडून बैलाचे शारीरिक चाचणी प्रमाणपत्र गरजेचे
- शर्यतीवेळी लाठी काठी हातानं मारहाण करता येणार नाही बैलांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी
- शर्यतींचे व्हिडीओ १५ दिवसात कलेक्टरकडे सबमीट करायचे
- व्हिडीओत हिंसा केल्याचे निदर्शनास आले तर ३ वर्ष शिक्षा आणि ५ लाख दंडाची तरतूद
- दोषींना पुन्हा कधी शर्यतीत सहभाग घेता येणार नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या